
दिल्ली बॉम्बस्फोटाप्रकरणी दहशतवादी डॉक्टर उमरबाबत दरदिवशी वेगवेगळे खुलासे होत आहेत. आता आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. उमरने अल फलाह विद्यापिठाच्या शेजारी भाड्याचे घर घेऊन त्यात बॉम्ब बनविण्याची प्रयोगशाळा तयार केली होती. तिथून अनेक स्फोटक उपकरणे सापडली आहेत. त्याला टेलिग्रामच्या माध्यमातून जैशच्या हॅण्डलरकडून पाकिस्तानातून निर्देश मिळत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, उमरच्या कारमध्ये सापडलेले आयईडी नीट एकत्र केलेला नव्हता. ते त्याने घरी तयार केलेले होते. त्याने लाल किल्ल्याच्या समोर रेड लाईटजवळ स्फोट घडविण्यात आला ज्यामध्ये 12 लोकांचा मृत्यू झाला आहे. उमरच्या घरी छापेमारी दरम्यान बॉम्बची प्रयोगशाळा सापडली आणि ज्यामध्ये अनेक टेस्टिंग उपकरणेही होती. फरीदाबादहून डॉ. मुजम्मिलच्या उमरच्या या प्रयोगशाळेबाबत कळले. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, डॉ.मुजम्मिल आणि डॉ.अदिल हे दहशतवादी पाकिस्तानमधील जैश हॅण्डलर फैजल, हाशिम आणि उकाशा यांच्याशी संपर्कात होते. ते टेलिग्रामच्या माध्यमातून बोलत होते.
तपास यंत्रणांच्या मते उमर हा बॉम्ब बनवण्यात एक्सपर्ट होता. त्यामुळे त्याने राहत्या घरातच प्रयोगशाळा उभारली. पाकिस्तानातून त्याला एक व्हिडीओ पाठवण्यात आला होता. हॅडलरच्या सूचनेप्रमाणे तो केमिकलचा वापर करायचा. तपासादरम्यान फरिदाबादमध्ये दोन ठिकाणी 358 किलोग्रॅम आणि 2563 किलो स्फोटके सापडली. यावरुन कळंत की या स्फोटापासून बॉम्ब बनवणे अजून बाकी होते. ही स्फोटके सुटकेस आणि बॅगमध्ये भरलेली होती. त्यात धातूचे तुकडे नव्हते. दहशतवादी सामान्यतः बॉम्बमध्ये लोखंडी गोळ्या वापरतात, ज्यामुळे मृतांची संख्या वाढते. शनिवारी नौगाम पोलिस स्टेशनमध्ये झालेल्या स्फोटाचा संबंध फरिदाबाद मॉड्यूलशी असल्याचे एजन्सींचे म्हणणे आहे. फरिदाबादमध्ये जप्त केलेली स्फोटके चाचणीसाठी नौगाम पोलिस स्टेशनमध्ये ठेवण्यात आली होती.




























































