सहकाऱ्याला दिला जमालगोट्याचे टॉपिंग असलेला पिज्झा, भंकस अंगलट आली

सामना ऑनलाईन। टेक्सास

अमेरिकेतील टेक्सास येथे गेल्या शुक्रवारी  प्रसिद्ध मि. जेम्स पिज्झा रेस्टॉरंट अगदी त़डकाफडकी बंद करण्यात आलं. पिज्झा व इतर इतर फास्ट फूड पदार्थांसाठी लोकप्रिय असलेल्या या हॉटेलमधील तीन कर्मचाऱ्यांनी आपल्या सहकाऱ्याची मजा करायची ठरवलं. या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या सहकाऱ्याला पिज्झावर जमाल गोटा पसरून तो खायला घातला. पिज्झा खाल्ल्यानंतर त्याची प्रकृती खराब झाली ज्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करावं लागलं. ही बातमी कळताच स्थानिक प्रशासनाने या हॉटेलचा परवाना काही काळासाठी रद्द केला असून हॉटेलदेखील बंद केलं आहे.

हॉटेलविरूद्ध झालेल्या कारवाईनंतर पीडित व्यक्तीने सोशल मीडियावर पोस्ट अपलोड केली आहे. हा प्रकार माझ्यासोबत झाला तसा तो इतर ग्राहकांसोबतही होऊ शकतो असा इशारा त्याने या पोस्टद्वारे दिला आहे. हॉटेलवरील कारवाई आणि या व्यक्तीच्या पोस्टमुळे जमालगोटा पिज्झा तयार करणाऱ्या कर्मचाऱ्यांची घाबरगुंडी उडाली आहे. या कर्मचाऱ्यांनी आपण निर्दोष असल्याचं सांगायला सुरूवात केली आहे.