तेरा वर्षाच्या गर्भवती मुलीवर सामूहिक बलात्कार, पीडितेची आत्महत्या

3446
प्रातिनिधिक फोटो

एका 13 वर्षांच्या गर्भवती मुलीचे अपहरण करुन तिच्यावर सहा नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर पीडितेने घराच्या छतावरून उडी मारुन आत्महत्या केल्याची भयंकर घटना शुक्रवारी थायलंडची राजधानी बँकाँकमध्ये घडली आहे. याप्रकरणी तीन जणांना अटक कऱण्यात आली आहे.

पीडित मुलीचे एका तरुणाबरोबर प्रेमसंबंध होते. त्यातूनच तिला दिवस गेले. याबद्दल तिला आपल्या प्रियकराला सांगायचे होते. यामुळे ती शुक्रवारी रात्री त्याला भेटण्यासाठी गेली. पण वाटेतच सहा जणांच्या एका टोळक्याने तिला गाठले. ते तिला छेडू लागल्याने तिने त्यास विरोध करत मदतीसाठी आरडाओरडा केला. हे बघताच टोळके अधिकच चवताळले व त्यांनी पीडितेला गाडीत कोंबून तिचे अपहरण केले. त्यानंतर तिला एका इमारतीच्या गच्चीवर नेण्यात आले. नंतर सहा नराधमांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला व तिथून पळ काढला.

या घटनेमुळे हादरलेल्या पीडितेने कसेबसे घर गाठले. नंतर तिने मी जग सोडून जात असून तुझ्यावर खूप प्रेम करत असल्याचा प्रियकराला मेसेज केला. फेसबुकवरही तिने आपण जगाचा निरोप घेत असल्याचे सांगितले. त्यानंतर ती घराच्या छतावर गेली व तिने खाली उडी मारुन आत्महत्या केली. यादरम्यान, आपण मुलीला वाचवण्याचा खूप प्रयत्न केल्याचे तिच्या आईने पोलिसांना सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या