
लोकल प्रवासात तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना घडली. तरुणीच्या तक्रारीवरून कुर्ला रेल्वे पोलिसांनी गुन्हा नोंद केला.
तक्रारदार तरुणी ही ठाण्यात राहते. गुरुवारी तिने ठाण्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाण्यासाठी लोकल पकडली. लोकलच्या पुरुष वर्गाच्या डब्यात ती बसली होती. मुलुंड स्थानक आल्यावर एक प्रवासी त्या डब्यात शिरला. त्यानंतर तो तिच्याकडे पाहत होता. तरुणीने त्याला विचारणा केली. त्याने तू मुलीसारखी असल्याचे सांगितले. लोकल मशीद बंदर स्थानकात आली. तिने घडल्या प्रकाराची माहिती गस्तीवर असलेल्या पोलिसांना दिली. तिने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.