‘जैश ए मोहम्मद’च्या नावाने 25 लाखांची मागणी, शहापुरातील खंडणीखोर तरुण गजाआड

वासिंद शहरातील शिवसेना पदाधिकारी व उद्योजक दत्ता ठाकरे यांना इसिस व जैश ए मोहम्मद या अतिरेकी संघटनांच्या नावाने धमकी देत 25 लाख रुपयांची मागणी करणाऱ्या शहापुरातील खंडणीखोर तरुणाला वासिंद पोलिसांनी गजाआड केले आहे.

काही दिवसांपूर्वी मोटरसायकलवरून आलेल्या युवकाने दत्ता ठाकरे यांच्या पत्नीकडे खाकी लिफाफा दिला. हा लिफाफा दत्ता शेठना द्या असे त्याने सांगितले. या लिफाफ्यावर उर्दू भाषेत इसिस अतिरेकी संघटनेचा लोगो होता. चिठ्ठीमध्ये आम्ही ‘जैश ए मोहम्मद’ चे कमांडो आहोत. आमचा लढा तुमच्या विरोधात आहे. आम्हाला हत्यारे खरेदी करायची आहेत. यासाठी अघई रोडवर 25 लाख रुपये 16 तारखेला घेऊन ये नाहीतर तुला व तुझ्या मुलाला ठार मारू अशी धमकी या पत्रात दिली होती. पोलिसांना कळवल्यास याद राख असे ठळक अक्षरात लिहिले होते. मजकुराखाली प्र. मो. अन्सारी अशी मराठीत सही केली होती. दत्ता ठाकरे यांनी तत्काळ पोलिसांना कळवले तसेच टेंभरे गावात जाऊन चौकशी केली असता वैभव किसन सातपुते बेपत्ता असल्याचे समजले.

आपली प्रतिक्रिया द्या