ठाण्यातील जांभळी नाका येथील भाजीपाला मार्केट स्थलांतरीत करणार

381

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी वारंवार सूचना देण्यात आल्या आहेत. तरीही सोशल डिस्टन्स नियमाचे पालन होत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे ठाण्याचे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी जांभळी नाका येथील मुख्य भाजीपाला मार्केट तात्पुरत्या स्वरूपात शहराच्या विविध भागांमध्ये हलविण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे.

सिंघल यांनी महापालिकेचे अधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांसमवेत गुरुवारी जांभळी नाका मार्केटची पाहणी केली. यापूर्वीही त्यांनी या मार्केटची पाहणी करून तेथील घाऊक आणि किरकोळ भाजीपाला विक्रेत्यांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सचा नियम पाळण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर मुख्य मार्केट बंद करून ते तलावपाळी आणि सुभाष पथ या ठिकाणी मार्किंग करून तिथे स्थलातंरित करण्यात आले होते. याबाबत महापालिका आणि पोलीस प्रशासनाने अनेकदा हस्तक्षेप करूनही सोशल डिस्टन्स नियमांचे उल्लघंन झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पाहणी करून महापालिका आयुक्त सिंघल यांनी भाजीपाला मार्केट आता पारसिक रेतीबंदर, पोखरण रोड नं.1, हायलँड मैदान आणि घोडबंदर रोड येथील डी मार्टच्यामागील बोरिवडे मैदान या ठिकाणी स्थलातंरित करण्याचा निर्णय घेतला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या