ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण कल्याण-डोंबिवलीत, बाधितांचा आकडा 38 वर

521

ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण कल्याण डोंबिवलीत झाले आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा फैलाव वाढत असून आता टिटवाळ्यातही कोरोनाने शिरकाव केल्याने प्रशासन चिंतेत आहे. कल्याण डोंबिवली पूर्ण लॉकडाऊन केली असून आतापर्यंत कोरोना बाधितांचा आकडा 38 वर गेला आहे.

दररोज नव्याने कोरोना बाधीत रूग्‍ण आढळून येत असल्याने प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. कल्‍याण पूर्वमध्ये 6, कल्‍याण पश्चिममध्ये 7, डोंबिवली पूर्वमध्ये 18, डोंबिवली पश्चिममध्ये 6 आणि टिटवाळा येथे 1 कोरोनाबाधित रुग्ण आहे. पालिका क्षेत्रातील रूग्‍णसंख्‍या 38 झाली आहे.

दरम्यान रिपोर्ट निगेटिव्ह आलेल्या सात रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज नव्याने जे तीन कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत त्यामध्ये कल्याण पूर्व येथील महिला, डोंबिवली पूर्व येथील पुरुष आणि टिटवाळा पूर्व येथील महिला रुग्णाचा समावेश आहे. या सर्वांवर मुंबई येथे उपचार सुरू आहेत. ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण कल्याण डोंबिवलीत सापडत असल्याने दोन्ही शहरे लॉकडाऊन केली आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या