
ठाणे महापालिका हद्दीतील जेएनएनयूआरएम आणि बीएसयूपी योजनेच्या अंतर्गत प्रकल्पबाधितांना वैयक्तिक सदनिका करारनामा करताना आकारल्या जाणाऱ्या एक टक्के मुद्रांक शुल्कात सवलत देण्यात येणार आहेत. याशिवाय प्रकल्पबाधितांसाठी प्रतिदस्त 100 रुपये आकारण्यात येणार आहे.
जेएनएनयूआरएम आणि बीएसयूपी या योजना शहरी गरीब पुटुंबासाठी आहेत. ठाणे महानगरपालिकेमार्फत या दोन्ही योजनेंतर्गत विकसित करण्यात आलेले भूखंड सध्याच्या झोपडपट्टय़ांच्या जागी असून तेथील नागरिकांचे पुनर्वसन बीएसयूपी सदनिकांमध्ये केले जाते. प्रकल्पग्रस्त रहिवासी आर्थिकदृष्ट्या दुर्बल असून मजुरीची कामे करतात. त्यामुळे त्यांना सदनिका घेताना करारनामा दस्त नोंदणीचा मुद्रांक शुल्क अधिभार परवडणारा नाही. तसेच यातील काही कुटुंबांना मिळणाऱ्या सदनिकासाठी प्रत्येकी 56 हजार ते 1 लाख 34 हजार रुपये इतका अधिभार भरावा लागणार होता. ही बाब विचारात घेऊन या योजनेंतर्गतच्या शहरी गरीबांसाठी एक टक्के मुद्रांक शुल्क अधिभारात सवलत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाचा लाभ ठाणे महापालिका क्षेत्रातील 6 हजार 343 गरीब कुटुंबांना होणार आहे.
वांद्रे किल्ला येथे दारू पार्टी प्रकरणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी किल्ला परिसरात मद्यपान आणि धूम्रपानास बंदी असल्याचे पोस्टर लावले तसेच गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केले आणि पोलीस अधीकाऱ्यांना निवेदन दिले.





























































