ड्रेनेजच्या नावाखाली रस्ता खोदला; रॅबिट उचललेच नाही, संतप्त ठाणेकरांनी मिंधेंच्या ठेकेदारांचे काम बंद पाडले

ड्रेनेजच्या नावाखाली रस्ता खोदला असून रॅबिट उचलले नसल्याने ठाण्यातील संत ज्ञानेश्वरनगरमधील नागरिकांनी आज मिंधेंच्या ठेकेदारांचे काम बंद पाडले. महत्त्वाचा समजला जाणाऱ्या संपूर्ण रस्त्यावर रॅबिट पसरले असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. त्यातच मंगळवारी रात्री पडलेल्या पावसामुळे दारात साचलेला चिखल तुडवत नागरिकांना घरात जावे लागत आहे. घराघरात उग्र वास पसरला असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

गेल्या तीन वर्षांपासून ठाणे पालिकेत प्रशासकीय असा प्रश्न नागरिक विचारत राजवट सुरू आहे. नगरसेवक नसल्याने अनेक प्रभागांना सध्या कोणीच वाली नसल्याचे चित्र असताना वागळे इस्टेटमधील संत ज्ञानेश्वरनगरमध्ये अनेक विकासकामे रखडली आहेत. सध्याच्या घडीला या प्रभागात अनेक पायाभूत सुविधांची वानवा आहे. या भागात कधी पाणी नाही, तर कधी अशुद्ध पाण्याचा पुरवठा केला जात आहे. तसेच गटारांची कामे अर्धवट अवस्थेत असून ऐन पावसाळ्याच्या तोंडावर मिंधे गटाच्या ठेकेदाराने ड्रेनेज लाइनच्या कामाचा नारळ फोडला.

दरम्यान, स्थानिक पदाधिकाऱ्यांना नवीन ड्रेनेज लाइन टाकण्याचे काम मिळाले नसल्याने कुरघोडी सुरू आहेत. मात्र तुमचे राजकारण बाजूला ठेवा आणि पहिले काम पूर्ण करा अशी तंबी आज स्थानिक नागरिकांनी दिली. ज्ञानेश्वरनगरला कोणी वाली आहे की नाही, असा प्रश्न आम्हाला पडला आहे. आधीच पाण्याचे लाइन टाकण्याचे काम पूर्ण होत नाही त्यात ड्रेनेज लाइनच्या नावाखाली संपूर्ण रस्ता खोदून ठेवला आहे.

वाहने पार्क करण्याची गैरसोय

ज्ञानेश्वरनगरमध्ये पाइपलाइन रोड ते पंचपरमेश्वर मंदिर हा साधारण 50 मीटर काँक्रीट रस्ता अक्षरशः खोदून ठेवला आहे. या भागात जवळपास दहा ते बारा मोठमोठ्या सोसायट्या पार्किंग करण्याची प्रचंड असून नागरिकांना वाहने गैरसोय झाली आहे. त्यातच उन्हाळी सुट्ट्या असल्याने मुलांनी खेळायचे कुठे, आहेत.