जाब विचारणाऱ्या सासूला जावयाने खिडकीतून फेकले

सामना ऑनलाईन। ठाणे

मुलीला त्रास दिल्याने जाब विचारण्यासाठी गेलेल्या सासूला जावयाने खिडकीतून बाहेर फेकून दिल्याची धक्कादायक घटना ठाणे येथे घडली आहे. अंकुश धीरज भट्टी (३२) असे आरोपीचे नाव आहे. तर कमलजीत कौर सुरेंद्रसिंग सामलोग (६५) असे मृत महिलेचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी अंकुशवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घोडबंदर रोड येथील भाईंदर पाडा येथे रुमाबाली सोसायटीत अंकुश पत्नीबरोबर राहतो. गेले काही दिवस त्यांच्यात खटके उडत होते. यामुळे कमलजीत कौर अंकुशला याचा जाब विचारण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी चिडलेल्या अंकुशने त्यांच्या डोक्यात जवळच पडलेली स्प्रेची बाटली मारली व त्यांना खिडकीतून खाली फेकून दिले. यात कमलजीत कौर यांची जागीच मृत्यू झाला.

summary-son in law killed mother in law