थंडीचा कडाका आणखी वाढणार

मुंबईसह राज्यात थंडीचा कडाका पुन्हा एकदा वाढणार असल्याचे हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आले आहे. कुलाबा आणि सांताक्रुझ येथील केंद्रात तापमान 3 ते 4 अंश सेल्सिअसपर्यंत घट होणार असून पहाटे आणि रात्रीच्या वेळी गारठा अधिक तीव्र होणार असून दिवसभर गारवाच राहणार आहे. किमान तापमान 18 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले. यातच वाऱ्याचा वेग आणि हवेतील आर्द्रतादेखील वाढली आहे. वाढलेल्या गारठय़ामुळे आजारांना निमंत्रण मिळण्याचा धोका असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.