क्रिप्टोकरन्सी बाजारात बुधवारी मोठी घसरण झाली. बिटकॉइन, इथेरियम आणि डॉजक्वाइन या प्रमुख क्रिप्टोकरन्सीमध्ये 5 टक्क्यांहून जास्त घसरण झाली. ग्लोबल क्रिप्टोकरन्सीचे मार्केट कॅप सुद्धा 5 टक्क्यांनी घसरले. बिटकॉइनची किंमत 60 हजार डॉलरच्या खाली आली. गेल्या 24 तासांत बिटकॉइनच्या किंमतीत 5.61 टक्के घसरण झाली.