पदवी प्रवेशाची आज पहिली गुणवत्ता यादी; दोन लाख 50 हजार 453 विद्यार्थ्यांनी केली प्रवेशपूर्व नोंदणी

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थामध्ये शैक्षणिक वर्ष 2024-25साठी 3 आणि 4 वर्षीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी उद्या (13 जून संध्याकाळी 5 वाजता) पहिली गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. 25 मेपासून सुरू केलेल्या प्रवेशपूर्व नाव नोंदणीस विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून  एकूण 2 लाख 50 हजार 453 विद्यार्थ्यांनी प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणी केली आहे. विद्यार्थ्यांनी विविध अभ्यासक्रमांसाठी 8 लाख 70 हजार 595 एवढे अर्ज सादर केले आहेत.

मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालये आणि स्वायत्त महाविद्यालयांनी निर्गमित केलेल्या या वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रिया राबवावी तसेच महाविद्यालयांकडे असलेल्या प्रवेश क्षमतेनुसार, आरक्षणाचे नियम व तरतूद आणि अभ्यासक्रमांच्या पात्रतेनुसार प्रवेश प्रक्रिया राबवावी, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौंदळे यांनी सांगितले.

शाखानिहाय आलेले अर्ज

बीकॉम 1,88,390, बीकॉम (मॅनेजमेंट स्टडीज) 41,051, बीकॉम (अकाऊंट अॅण्ड फायनान्स) 1,11,812, बीए 60,826, बीएस्सी आयटी 1,04,984, बीएस्सी 41,292, बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स 66,187, बीएएमएमसी (स्वायत्त) 25,640, बीकॉम (बँपिंग अँड इन्शुरंस – स्वायत्त) 12,952, बीकॉम (फायनान्शिअल मार्पेट – स्वायत्त) 25,123, बीएस्सी (बायोटेक्नोलॉजी – स्वायत्त) 18,953, बॅचरल ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (ई-कॉमर्स – स्वायत्त) 14, 861.