
तोंडावर मास्क आणि हेल्मेट घालून पादचाऱ्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पसार होणाऱया एका सराईत चोराच्या टिळकनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. उजव्या हातावरील टॅटय़ूच्या आधारे पोलिसांनी त्याला शोधून काढले.
शोभिता मोहिते (44) या चेंबुरच्या पिस्तम सागर सबवे समोरील रोडवरून घराच्या दिशेने चालत जात असताना पल्सर दुचाकीवरून आलेल्या चोराने शोभिता यांच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून नेली होती. याप्रकरणी टिळक नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सपोनि राहूल वाघमारे, उपनिरीक्षक विजय देशमुख व पथकाने आरोपीचा शोध सुरू केला. सीसीटिव्ही फुटेल तपासले पण त्याचा म्हणावा तसा फायदा होत नव्हता. आरोपी तोंडावर मास्क लावून आणि हेल्मेट घालून फिरत असल्याने त्याचा शोध घेणे मुश्किल झाले होते.



























































