नॅशनल फार्मास्युटिकल प्राइंस अथॉरिटीने आठ शेड्यूल औषधांच्या कमाल किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या औषधांचा वापर दमा, टीबी, ग्लुकोमासह इतर अनेक आजारांवर उपचारासाठी केला जातो.
हेल्थ अँड फॅमिली अफेयर मंत्रालयाने याबाबत सांगितले की, आठ औषधांच्या अकरा शेड्यूल फॉर्म्युलेशनच्या कमाल किमती त्यांच्या विद्यमान कमाल किमतींपेक्षा 50 टक्क्यांनी वाढवण्यास मान्यता दिली. याआधी 2019 आणि 2020 मध्ये 21 तसेच 9 फॉर्म्युलेशन औषधांच्या किमती 50 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
औषधांच्या कमाल किमती इतक्या कमी होत्या की या बजेटमध्ये ही औषधे उत्पादित करणे आणि मार्केटिंग करणे कंपन्यांना परवडत नक्हते. यामुळे काही कंपन्यांना या औषधांची मार्केटिंगदेखील बंद करावी लागली. त्यानंतर काही कंपन्यांना एनपीपीएने मार्केटिंग बंद न करण्याची किनंती केली होती. कारण काही औषधे अत्यंत जीवनावश्यक आहेत. त्यामुळे या औषधांच्या पुरवठ्यावर विपरीत परिणाम होत होता. रुग्णांसह डॉक्टरांनाही अनेक समस्यांचा सामना करावा लागल्याचे सरकारने म्हटले आहे.