अरेच्चा! वरातीतून नवरदेवाला घेऊन घोडी पळाली!!

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होतात. त्यातले काही व्हिडिओ पाहून हसावे की रडावे, असा प्रश्न निर्माण होतो. सध्या राजस्थानच्या अजमेरमधील एका वरातीमधील व्हिडिओ तुफान गाजतोय. भर वरातीमधून चक्क नवरदेवाला घेऊन घोडी पसार झाल्याचे यात पाहायला मिळतेय.

झाले असे की, नसिराबादमधील रामपुरा गावातील एका नवरदेवाची घोडय़ावरून वरात काढण्यात आली. अचानक फटाक्याचा आवाज ऐपून घोडी घाबरली. नवरा खाली उतरण्याआधीच तिने धूम ठोकली. त्यामुळे नवरदेवही घोडीबरोबर निघून गेला. या घटनेमुळे वऱहाडी मंडळींच्या चेहऱयावरील आनंदाची जागा चिंतेने घेतली. या प्रकारानंतर नवरदेवाला मळमळल्यासारखं होऊ लागलं. थोडा वेळ विश्रांती घेतल्यावर पुढील प्रथा पूर्ण करून लग्न लावण्यात आलं. सुदैवाने त्या वेळी रस्त्यावर कोणतीही वाहने नसल्याने मोठा अपघात झाला नाही.

आपली प्रतिक्रिया द्या