सामना प्रभाव -वरळीतील रस्त्याने घेतला मोकळा श्वास

वरळीतील हाजी अली येथील लोटस जेट्टीजवळील कोस्टल रोडवर मासेमारी बोट नांगरून ठेवली होती. याबाबत दैनिकसामनामध्ये बातमी प्रसिद्ध झाली होती. शिवसेना नेते, युवासेना प्रमुखआमदार आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार युवासेना उपविभाग अधिकारी अभिजीत पाटील यांनी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास शिंगरे, महापालिका जीदक्षिण विभागाचे कनिष्ठ अभियंता श्रीधर वागराळकर यांच्या ही बाब निदर्शनाला आणून दिली. त्यांनी तत्काळ वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या बोटीवर कारवाई करून रस्ता मोकळा करून दिला.