
पश्चिम रेल्वे मार्गावरील अनेक लोकल ट्रेन आणि मेल-एक्स्प्रेस गाडय़ांच्या वेळापत्रकात गुरुवार, 1 जानेवारी 2026 पासून बदल होणार आहे. लोकलच्या वेळा सुधारण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. विशेषतः डहाणू रोड विभागाच्या लोकलचे वेळापत्रक बदलणार आहे. प्रशासनाने डहाणू रोडहून अप-डाऊन दिशेने धावणाऱ्या ईएमयू सेवांचे सुधारित वेळापत्रकदेखील जाहीर केले आहे. सुधारित वेळापत्रकामध्ये डहाणू रोड, विरार आणि चर्चगेट या स्थानकांदरम्यान धावणाऱ्या सेवांचा समावेश आहे.
नवीन वेळापत्रकानुसार अनेक डाऊन ईएमयू सेवा पहाटे 5.03 वाजल्यापासून चर्चगेटहून सुटणार आहेत. सुधारित वेळापत्रकासंबंधी सविस्तर माहिती स्टेशन मास्तरांकडे उपलब्ध असेल. प्रवाशांनी गाडय़ांच्या बदललेल्या वेळांची नोंद घेऊन आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन पश्चिम रेल्वे प्रशासनाने केले.


























































