गेल्या तीन दिवसांपासून शेअर बाजारात उसळी दिसत असून आज शुक्रवारी बाजार पुन्हा एकदा झेपावला. मुंबई स्टॉक एक्सचेंजचा (बीएसई) निर्देशांक आज 1618 अंकांच्या वाढीसोबत 76693 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 468 अंकांच्या वाढीसोबत 23290 अंकांवर बंद झाला.
शेअर बाजार तेजीत असल्यामुळे गुंतवणूकदारांनी गेल्या तीन दिवसांत जवळपास 26 लाख कोटी रुपये कमावले आहेत. शुक्रवारी बीएसईचा मार्पेट पॅप वधारून 421 लाख कोटी रुपये झाला आहे. जो मंगळवारी 395 लाख कोटी रुपये होता. आज सेन्सेक्सचे सर्वच्या सर्व 30 शेअर वाढीसोबत बंद झाले. यात महिंद्रा अँड महिंद्राचे शेअर सर्वाधिक 5.83 टक्के वाढले. इन्पह्सीसचे 4.4 टक्के तर टाटा स्टील 5.09 टक्के वाढीसोबत बंद झाले. आयटी, टेलिकॉम आणि ऑटो शेअर्समध्ये चांगली वाढ पाहायला मिळाली. बीएसई मिडपॅप आणि स्मॉल पॅप इंडेक्स 1.28 टक्के आणि 2.18 टक्के वाढीसोबत बंद झाले.
आयसीआयसीआय बँकेला सेबीचा इशारा
आयसीआयसीआय बँकेला आपल्या आउटरीच प्रोग्रामवरून सेबीने इशारा दिला आहे. आयसीआयसीआय बँकेचे काही अधिकारी शेअर धारकांना वारंवार पह्न करून वोटिंगचा स्क्रीनशॉट मागत होते, हे अत्यंत चुकीचे आहे, असे सेबीने म्हटले आहे. डिलिस्टिंग योजनेच्या बाजूने मतदान करण्यासाठी अनेक कॉल आणि मेसेज करण्यात आले, असे शेअरधारकांनी म्हटले आहे.