ऑफिस आणि कामाच्या दडपणामुळे नोकरी करणाऱ्या तरुणांना स्वतःसाठी वेळ मिळत नाही. यामुळे अनेकदा मोठ्या समस्या उद्भवू शकतात. यामुळे एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क-लाइफ बॅलन्स देण्यासाठी एक उपक्रम सुरू केला आहे. याची जगभरात चर्चा सुरू आहे.
हा उपक्रम थाइलंडमधील व्हाइटलाइन ग्रुप या कंपनीने सुरू केला आहे. ही कंपनी मार्केटींगचे काम करते. स्ट्रेस टाईम्सच्या माहितीनुसार कंपनीच्या या उपक्रमानुसार त्यांचे कर्मचारी डेटला जाण्यासाठी सुट्टी घेऊ शकतील आणि त्या दिवसाचा पगारही कापला जाणार नाही. तसेच कंपनीने या लीव्ह पॉलिसीला टेंडर लिव्ह नाव दिले होते. त्याला डेटींग लिव्ह असेही म्हणले जाते. तसेच कंपनी कर्मचाऱ्यांना गोल्ड टेंडर आणि प्लॅटिनम टेंडरचे सब्सक्रिप्शन उपलब्ध करून देतेय. ही सवलत कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी आहे. परंतु लिव्ह टेंडरसाठी किती सुट्ट्या उपलब्ध होऊ शकतात? याबाबत कंपनीने कोणतीही माहिती दिलेली नाही.
व्हेलेन्टलाइन ग्रुपची टेंडर लिव्ह पॉलिसी जुलैपासून सुरू झाली आहे. आणि या वर्षाच्या अखेरीस कंपनीत जॉईन होणारे कर्मचारी या ऑफरचा लाभ घेऊ शकतील. कंपनीने या पॉलिसीची माहिती प्रोफेशनल सोशल नेटवर्क लिंक्डइनवरही दिली आहे. आमचे कर्मचारी एखाद्याला डेट करण्यासाठी टेंडर सुट्टी वापरू शकतात, असे कंपनीने लिंक्डइनवर एका पोस्टमध्ये लिहिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या कंपनीने कर्मचाऱ्यांवरील विचार करत हा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. या कंपनीत जवळजवळ 200 कर्मचारी कार्यरत आहेत. तर या कंपनी पॉलीसीनुसार या वर्षी 9 जुलै ते 31 डिसेंबरपर्यंत कंपनी जॉईन करणाऱ्याला या ऑफरचा लाभ घेण्याची संधी मिळते.