क्लिनिकमध्ये चोरी; दोन महिलांना अटक

चेंबूर येथील एका क्लिनिकमध्ये 10 लाख रुपयांची चोरी केल्याप्रकरणी चेंबूर पोलिसांनी तेथे काम करणाऱ्या दोघा महिला कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. 6 सप्टेंबरच्या दिवशी क्लिनिकच्या मालकीण डॉ. हेगडे यांना  जमा झालेली रोकड बँकेत जमा करता आली नव्हती. त्यामुळे 10 लाखांची रोकड क्लिनिकमध्येच होती.

त्याच दिवशी रात्रीच्या वेळेस त्यांनी त्यांच्या मोबाईलवर सीसीटीव्ही फुटेज तपासले असता कॅमेरा बंद असल्याचे आढळून आले. काहीतरी गडबड असल्याचा संशय बळावल्याने महिला डॉक्टर तत्काळ क्लिनिकमध्ये पोहचल्या. त्यांनी क्लिनिकमधील ड्रॉव्हरची पाहणी केली असता 10 लाखांची रोकड तेथे नसल्याचे आढळून आले.