गढी येथील तुळजाभवानी मंदिरात चोरी; देवीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला

1139

गढी येथील तुळजाभवानी मंदिरात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी तुळजाभवानी मंदिरात चोरी केली. देवीच्या सुमारे एक लाख सहा हजार किंमतीच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारला. याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या तुळजाभवानी देवीच्या मंदिरात रात्री दीड वाजण्याच्या सुमारास चोरटे घुसले. त्यांनी देवीचे सोने व चांदीचे सुमारे एक लाख सहा हजार रुपयांच्या किंमतीचे दागिने लांबवले. सोमवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास पूजा करण्यासाठी पुजारी मंदिरात गेल्यावर ही घटना उघडकीस आली. पुजाऱ्यांना मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले आढळले. चोरीच्या घटनेबाबत पोलिसांना कळवण्यात आले. गेवराई पोलीस उप अधीक्षक स्वप्निल राठोड, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक भारत राऊत आणि पथकातील अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. घटनेची पाहणी करून पुढील तपास करण्यासाठी दोन पथकांची नेमणूक करण्यात आली. श्रीपाद रामदास यांच्या तक्रारीवरून गेवराई पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एपीआय तडवी करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या