किनगावात चोरांचा धुमाकूळ, माजी सरपंचाच्या घरी धाडसी चोरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । किनगाव

किनगाव येथे मंगळवारी मध्यरात्रीच्या दरम्यान माजी सरपंचांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. चोरट्यांनी मुख्य वाडयाचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. चोरांनी कपाटातील दागिने व रोख रक्कम पळविल्याची तक्रार माजी सरपंच विठ्ठलराव बोडके यांनी दिली आहे. किनगावामध्ये चोरट्यांनी मंगळवारी रात्री एकूण चार ठिकाणी चोरी केली.

मंगळवारी मध्यरात्री यांचा चोरट्यांनी माजी सरपंच विठ्ठलराव रंभाजी बोडके यांच्या घरी २ ते ३ वाजण्याच्या दरम्यान घराच्या खोलीचे कुलुप तोडून चोरी केली आहे. यात ३ लाख ३२ हजार किंमतीचे सोन्याचांदीचे साडे सोळा तोळ्याचे दागिने, रोख रक्कम ७ लाख ५० हजार रूपये असा एकूण १० लाख ८२ हजार रुपयाचा ऐवज चोरी केला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.