लातूरात घरफोडी करून 70 हजार रुपये लांबवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

लातूरमधील देवणी तालुक्यातील डोंगरेवाडी येथील घरफोडी करून अज्ञात चोरट्याने 70 हजार रुपये लांबवे आहेत. या प्रकरणी तानाजी शिवाजी डोंगरे (रा. डोंगरेवाडी, ता. देवणी) यांनी देवणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तक्रारदार कोरोनाबाधित असल्याने ते 8 ते 27 एप्रिलदरम्यान शेतात राहत होते. त्यानंतर घरी परतले असता अज्ञात चोरट्याने तक्रारदाराच्या घराचे कुलूप तोडून कपाटाची चावी काढून आतील 70 हजार रुपये चोरल्याचे दिसून आले. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.