
प्रेस शॉपमधून चार अनोळखी चोरट्यांनी एक लाख 12 हजार 884 रुपये किमतीचा कच्चा माल चोरून नेला. ही घटना बुधवारी (दि. 16) पहाटे 2.45 ते 3.45 वाजण्याच्या दरम्यान निघोजे येथील फडकेवस्तीतील विनय कार्पोरेशन प्रा. ली. येथे घडली. प्रशांतकुमार नरेंद्रकुमार त्रिवेदी (वय 30, रा. चाकण) यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी चार अनोळखी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार काम करत असलेल्या कंपनीच्या गेटवरून चार अनोळखी चोरटे कंपनीत शिरले. कंपनीतून एक लाख 12 हजार 884 रुपये किंमतीचा कच्चा माल चोरट्यांनी चोरून नेला. हा प्रकार कंपनीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणी चाकण पोलीस अधिक तपास करीत आहेत.


























































