चाकरमान्यांनो इकडे लक्ष द्या; 10 जूनपासून कोकण रेल्वेच्या वेळापत्रकात बदल होणार

पावसाळा सुरू झाला की कोकण रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्यात येतो. यंदाही तसा बदल करण्यात आला असून 10 जून पासून मान्सून वेळापत्रक लागू होणार आहे.

कोकणामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमामात पाऊस पडतो. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात येतो. यंदाही कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. हे वेळापत्रक 10 जून पासून ते 31 ऑक्टोबरपर्यंत लागू असणार आहे. या वेळापत्रकानुसार पुढील प्रमाणे गाड्यांच्या वेळेमध्ये बदल करण्यात आले आहेत.

मडगाव येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक

  • कोकणकन्या एक्सप्रेस – मडगाव येथून 6 वाजता सुटणार आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वा. 40 मिनीटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहचेल.
  • वंदेभारत एक्सप्रेस – मडगाव येथून दुपारी साडे बारा वाजता सुटेल आणि संध्याकाळी 10 वा. 35 मिनीटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहचेल.
  • जनशताब्दी एक्सप्रेस – मडगाव येथून दुपारी 12 वाजता सुटेल आणि रात्री 11 वा. 55 मिनीटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहचेल.
  • मांडवी एक्सप्रेस – मडगाव येथून सकाळी साडे आठला सुटेल आणि रात्री 9 वा. 45 मिनीटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहचेल.
  • मडगाव एलटीटी एक्सप्रेस – मडगाव येथून सकाळी साडे अकरा वाजता सुटेल आणि रात्री 11 वा. 35 मिनीटांनी एलटीटी पोहचेल.
  • तेजस एक्सप्रेस – मडगाव येथून दुपारी 12 वाजून 50 मिनीटांनी सुटेल आणि रात्री 12 वा. 20 मिनीटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहचेल.

तसेच जनशताब्दी एक्सप्रेस, मंगलूरू-मुंबई एक्स्प्रेस आणि तेजस एक्सप्रेस 7 जुलै पर्यंत दादर स्थानकापर्यंतच धावणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनस येथून मडगावला जाणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक

  • कोकणकन्या एक्सप्रेस – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री 11 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाली 11 वा. 40 मिनीटांनी मडगावला पोहचेल.
  • वंदेभारत एक्सप्रेस – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 5 वा. 25 मिनीटांनी सुटेल आणि दुपारी साडेतीन वाजता मडगावला पोहचेल.
  • जनशताब्दी एक्सप्रेस – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 5 वा. 10 मिनीटांनी सुटेल आणि सायंकाळी साडेचार वाजता मडगावला पोहचेल.
  • मांडवी एक्सप्रेस – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 7 वा. 10 मिनीटांनी सुटेल आणि रात्री 9 वा. 45 मिनीटांनी मडगावला पोहचेल.
  • मडगाव एलटीटी एक्सप्रेस – एलटीटी येथून रात्री 12 वा. 45 मिनीटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी दोन वाजता मडगावला पोहचेल.
  • तेजस एक्सप्रेस – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 5 वा. 50 मिनीटांनी सुटेल आणि सायंकाळी पाच वाजता मडगावला पोहचेल.