चोरी करायला आला…समोर शॅम्पेनची बाटली दिसली…मग काय झाले…वाचा सविस्तर

1277

चोरीच्या आणि चोरट्यांच्या अनेक बातम्या आपण वाचतो. चोरीसाठी चोर नवीन शक्कल लढवतात. तसेच कोणताही पुरावा मागे ठेवत नाहीत. मात्र, मुंबईतील मरीन ड्राइव्हच्या गिरीकुंज इमारतीत चोरीसाठी आलेला चोर त्याच्या एका चुकीमुळे पोलिसांच्या जाळ्यात अलगद सापडला. या चोरट्याला चोरी करतानाच घरातील महागडी शॅम्पेन पिण्याचा मोह झाला आणि तिथेच तो फसला. शॅम्पेन पिणे महागात पडेल, असा विचार चोरानेही केला नसेल.

गिरीकुंज इमारतीतील एका उद्योगपतीच्या घराची रेकी करून चोराने तिथे चोरी करण्याची योजना आखली. तो बाल्कनीतून घरात घुसला. चोरी करण्यासाठी त्याने घरात वस्तू शोधयला सुरुवात केली. त्याचवेळी त्याची नजर कपाटात ठेवलेल्या महागड्या शॅम्पेनवर गेली. चोरी करण्यापूर्वी थोडीशी शॅम्पेन घेण्याचा मोह त्याला झाला. त्याने शॅम्पेनची बाटली चव घेण्यासाठी उघडली खरी. मात्र, ती पूर्ण बाटली त्याने रिचवली. त्यानंतर त्याने मद्याच्या इतर बाटल्यांकडे मोर्चा वळवला. एक एक बाटली करता त्याने भरपूर मद्यपान केले. त्याला एवढी नशा चढली की, आपण कुठे आणि कशासाठी आलो आहोत, हेच तो विसरला. मनसोक्त मद्यपान करून तो तिथेच झोपून गेला.

घराची साफसफाई करण्यासाठी सकाळी सफाई कर्मचारी आले असता, त्यांना दरवाजा आतून बंद असल्याचे समजले. त्यांनी पोलिसांना बोलावून घेतले. चोराने एवढे मद्यापान केले होते, की तो तेथेच पडून होता. पोलिसांनी त्याला अटक करून चौकशी केली असता, ही घटना घडकीस आली. चोराचे नाव संजीव असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याकडून चाकू आणि चोरीसाठी लागणारे इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. घरातील कपाटात आणि फ्रीजमध्ये शॅम्पेनसह इतर मद्याच्या बाटल्या ठेवल्या होत्या, असे सफाई कर्मचाऱ्यांनी सांगितले. पोलिसांनी चोराला अटक केल्यानंतर काही बाटल्या केराच्या टोपलीत होत्या. तर काही रिकाम्या करून परत फ्रीजमध्ये ठेवल्या होत्या. त्यावरून चोराने मोठ्या प्रमाणात मद्यपान केल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या