बसमधून प्रवास करताना 70 हजारांचे सोन्याचे दागिने पळवले

शिरुर ताजबंद ते जळकोट बसमधून प्रवास करत असताना महिलेच्या पर्समधील 70 हजार रुपयांचे सोन्याचे दागीने पळवण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी अहमदपूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरील चोरी प्रकरणी शिवनंदा रामदास कटके रा. माळी गल्ली जळकोट यांनी अहमदपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, त्या शिरुर ताजबंद ते जळकोट असा प्रवास एस.टी.बसमधून करत होत्या.

त्यांच्या बॅगमध्ये ठेवलेल्या पर्समध्ये 1 तोळ्याची सोन्याची पोत, 12 ग्रॅम वजनाची एक सोन्याची बोरमाळ, सोन्याचे मनीमंगळसूत्र 6 ग्रॅम वजनाचे असे सुमारे 70 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने काढून घेतले. अहमदपूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तिविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस कर्मचारी सन्मुखराव हे करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या