
हिंदुस्थानने हवाई हल्ले करून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील दहशतवाद्यांचे 9 तळही उद्ध्वस्त केले आहेत. या हल्ल्यांमध्ये जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा सारख्या दहशतवादी संघटनांचे 100 हून अधिक दहशतवादी मारले गेले आहेत. 22 एप्रिल 2025 ला जम्मू आणि कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा हिंदुस्थानी सैन्याने पाकिस्तानकडून असा बदला घेतला आहे. पाकिस्तानच्या पुढील सात पिढ्या लक्षात ठेवतील. 7 मे रोजी हिंदुस्थानने ज्या पद्धतीने ऑपरेशन सिंदूर राबवले त्यामुळे संपूर्ण पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे.
हिंदुस्थानने केलेल्या या कृतीने पाकिस्तान हादरला आणि पाकिस्तान सरकार आणि लष्कराने प्रत्युत्तर देण्याची धमकी देण्यास सुरुवात केली. आता सर्वांच्या नजरा पाकिस्तानवर आहेत. पाकिस्तानने 8 मे च्या पहाटे हिंदुस्थानवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हिंदुस्थानने हा प्रत्येक हल्ला हाणून पाडला आहे. एवढेच नाही तर हिंदुस्थानने पाकिस्तानची हवाई यंत्रणाही नष्ट केली आहे. एस-400 क्षेपणास्त्राने पाकिस्तानच्या चिंधड्या उडवल्या. या सर्व परिस्थितीकडे पाहता अगदी सोप्या शब्दांत सांगायचे तर हिंदुस्थान पूर्ण तयारीनिशी युद्धासाठी सज्ज आहे.
पाकिस्तानने कोणतीही प्रत्युत्तरात्मक कारवाई केली तर त्याला जोरदार प्रत्युत्तर मिळेल, असेही हिंदुस्थानकडून स्पष्ट करण्यात आले आहे. लष्कर आणि हवाई दल हाय अलर्टवर आहे. सीमेवर, विशेषतः पाकिस्तानला लागून असलेल्या राज्यांमध्ये, दक्षता वाढवण्यात आली आहे. पंजाब आणि जम्मू-काश्मीरसारख्या सीमावर्ती भागात सुरक्षा दल पूर्णपणे सतर्क आहेत. लष्कराने, विशेषतः हवाई दलाने, हवाई सराव सुरू केले आहेत. यात राफेल, मिराज 2000 आणि सुखोई-30 सारख्या लढाऊ विमानांचा समावेश आहे. हे सराव जमिनीवरून आणि हवेतून हवेत होणाऱ्या लढाईची तयारी करण्यासाठी आहेत. याशिवाय, 244 शहरांमध्ये मॉक ड्रिल घेण्यात आले आहे. यात हवाई हल्ल्यात टिकून राहण्याच्या पद्धती शिकवण्यात आल्या आहेत.