रक्षाबंधनासाठी महागड्या ओवाळणीऐवजी बहिणीला द्या ही भेट!

119

सामना ऑनलाईन । मुंबई

रविवारी संपूर्ण देशभरात राखी पौर्णिमा साजरी होत आहे. बहीण-भावाच्या या पवित्र बंधनाला उत्साहाने साजरं करण्यासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत. दरवर्षी राखी पौर्णिमेला अनेक भावांना हमखास पडणारा प्रश्न म्हणजे ओवाळणी काय द्यायची? तर या प्रश्नाचं उत्तर आम्ही तुम्हाला देऊ शकतो. यंदा बहिणीला नेहमीच्या ओवाळणीपेक्षा हे चार पर्यायांपैकी एखादा पर्याय तुम्ही तुमच्या बहिणीला ओवाळणी म्हणून देऊ शकता.

सुकन्या समृद्धी योजना-

तुमची बहीण १० वर्षांपेक्षा कमी वयाची असेल तर तुम्ही तिला सुकन्या समृद्धी योजनेची भेट देऊ शकता. या योजनेअंतर्गत तुम्ही प्रत्येक वर्षी कमीत कमी २५० रुपये तुमच्या बहिणीच्या नावे जमा करू शकता. अशा प्रकारे तुम्ही तिच्या वयाच्या १८ वर्षांपर्यंत किंवा त्याहूनही अधिक वयाची होईपर्यंत तिचं शिक्षण आणि लग्न यांच्या खर्चाला हातभार लावू शकता.

एसआयपी-
तुम्ही एक आधुनिक गुंतवणुकीचा पर्याय म्हणून बहिणीला म्युच्युअल फंडची भेट देऊ शकता. तुम्ही तिच्या नावे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान (एसआयपी) च्या माध्यमातून गुंतवणूक करू शकता. आताची ही गुंतवणूक कमी वाटली तरीही काही वर्षांनी तिला एकरकमी फायदा होऊ शकतो.

गोल्ड ईटीएफ-
गोल्ड ईटीएफ हा सोन्यातील गुंतवणुकीचा एक आधुनिक पर्याय आहे. तुम्ही जर तिला सोन्याचा दागिना भेट दिलात, तर तिला जो जबाबदारीने सांभाळून ठेवावा लागेल. पण, जर त्याऐवजी तुम्ही तिला गोल्ड ईटीएफ दिलात, तर भलेही तिच्याकडे प्रत्यक्ष दागिना नसेल. पण ईटीएफच्या माध्यमातून तिला गरज पडल्यास ती सोने खरेदी करू शकते.

फिक्स्ड डिपॉझिट्स-
हा पर्याय पारंपरिक वाटला तरीही अत्यंत सुरक्षित पर्याय आहे. यात कोणताही धोका नसल्यामुळे तसेच तुम्हाला ६ ते ८ टक्के व्याजही मिळेल. शिवाय तुमच्या बहिणीच्या नावावर एक चांगली रक्कमही सुरक्षित ठेवता येईल.

summary- this rakshabandhan give these unique gifts

आपली प्रतिक्रिया द्या