दोन उद्योगांसोबत 1 हजार 17 कोटींचे सामजंस्य करार

799

महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाची घोडदौड कायम आहे. मागील आठवड्यात उद्योग विभागाच्यावतीने 16 हजार कोटींचे सामज्यंस करार केले. त्यानंतर आज पुन्हा दोन महत्वाच्या उद्योगांसोबत सुमारे एक हजार 17 कोटींचे सामजस्य करार करण्यात आले. उद्योगमंत्री सुभाष देसाई, उद्योग विभागाचे सचिव वेणुगोपाल रेड्डी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अन्बलगन तसेच संबंधिक कंपन्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

पहिला करार सुप्रसिद्ध डीबीजी इस्टेट कंपनीसोबत 900 कोटी रुपयांचा गुंतवणूक करार करण्यात आला. याद्वारे 2700 नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. ही कंपनी अमेझॉन, फ्लिपकार्ट आदी कंपन्यांसाठी लॉजीस्टिक पार्क तयार करणार आहे. ही कंपनी भिवंडी येथे लॉजिस्टिक क्षेत्रात काम करणार आहे.

दुसरा करार जपानच्या आयडीयल केमी प्लास्ट कंपनीसोबत 117 कोटींचा गुंतवणूक करार करण्यात आला आहे. ही कंपनी अहमदनगर जिल्ह्यातील सुपा येथे आपला उद्योग सुरू करणार आहे. या ठिकाणी 88 जणांना थेट रोजगार उपलब्ध होणार आहे. संबधित कंपनी या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या