
सर्बियातील नवी साद शहरात सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधात हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले. विद्यापीठीन विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात सरकारवर गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले.
अध्यक्ष अलेक्झांडर वूचिच यांच्या विरोधात आंदोलन सुरू ठेवण्याची घोषणा करण्यात आली. ‘सरकार चोर आहे’ अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. नोव्हेंबर 2024 मध्ये नवी साद येथील रेल्वे स्थानकात झालेल्या अपघातामागे सरकारचा निष्काळजीपणा व भ्रष्टाचार कारणीभूत असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला. या अपघातात 16 जणांचा मृत्यू झाला होता.


























































