
चारचाकी, दुचाकी वाहने व बांधकाम साईटकरील साहित्याची चोरी करणाऱया टोळीचा शाहुपुरी पोलिसांनी पर्दाफाश केला. संशयितांमध्ये काही सराईत गुन्हेगारांचा सहभाग असून, तिघांना अटक करून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या टोळीकडून पाच गुह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले.
विपुल तानाजी नलवडे (रा. पिलेश्वरीनगर, सातारा), रोहित विश्वनाथ ननवरे, राहुल प्रमोद पवार (दोघे रा. करंजे, सातारा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
शाहुपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोऱयांचे प्रमाण काढले आहे. पोलिसांची गस्त सुरू असताना, त्यांना चोरटय़ांबाबतची माहिती मिळाली. त्यानुसार संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी गुह्यांची कबुली दिली. संशयितांकडून चोरीच्या कंपाउंडच्या जाळ्या, ऍल्युमिनियमची तार, दुचाकी, चारचाकी जप्त करण्यात आली.
संशयितांनी कंपाउंडच्या तारा चोरल्यानंतर त्या तारा घेऊन जाण्यासाठी कार चोरल्याचे समोर आले. दरम्यान, संशयितांकडे अधिक चौकशी केली असता, त्यांनी भोसले मळा, करंजे क किठोबाचा नळ परिसरातून अपार्टमेंटच्या पार्किंगमधून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. तसेच, या संशयितांनी करंजे परिसरामध्ये राहणाऱया एका परप्रांतीयाच्या घरात जाऊन जबरदस्तीने घुसून घरातील पैशाची बॅग चोरून नेल्याची कबुली दिली. संशयितांनी एकूण पाच गुह्यांची कबुली देऊन त्यांच्याकडून 3 लाख 67 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली शाहुपुरी पोलिसांनी ही काऱवाई केली.




























































