एकनाथ खडसेंच्या बंगल्यात चोरी करणाऱ्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या, सव्वासहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत

राज्याचे माजीमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील बंगल्यात झालेल्या चोरीप्रकरणी तिघांना अटक केली आहे. हे सर्व आरोपी उल्हासनगर येथील असल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी अटक केलेल्या या चोरांकडून खडसे यांच्या बंगल्यातून चोरलेले सोने आणि चांदीच्या दागिन्यांसह सव्वासहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. मात्र मात्र, सीडी आणि कागदपत्रांबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही.

दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील बंगल्यात २७ ऑक्टोबर रोजी चोरी केल्यानंतर चोरट्यांनी घराचे कुलूप फोडून आत प्रवेश केला होता. सहा ते सात तोळे सोने तसेच ३५ हजार रुपयांची रोकड लंपास केली. मात्र तपासात घरातील काही सीडी, पेनड्राईव्ह आणि महत्त्वाची कागदपत्रे गायब झाल्याचे खडसे यांच्या लक्षात आले. त्यामुळे या चोरीमागे नेमका हेतू काय होता, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याबाबत एकनाथ खडसे यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली होती. यातच आज पोलिसांनी याप्रकरणी तीन जणांना अटक केली आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.