
ठाण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन सख्या भावांनी मिळून बहिणीचा खून केला आहे. तसेच तिच्या मृतदेहाचे तुकडे करून जाळले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
ठाण्यात प्रतिभा म्हात्रे ही आपल्या तीन भावांसोबत राहत होती. नुकतंच तिचा घटस्फोट झाला होता म्हणून ती माहेरी भावांसोबत राहत होती. नंतर उदरनिर्वाहासाठी ती एका बीअर बारमध्ये काम करत होती. काही दिवसांनी तिघांना आपल्या बहिणीची वागणूक खटकायला लागली. यामुळे त्यांच्यात भांडणेही होत होती. अखेर 1 मे रोजी तिघांनी तिचा खून केला. तिच्या मृतदेहाचे तुकडे करून जाळून टाकले.
एका अज्ञात व्यक्तीने पोलिसांना ही खबर दिली. तेव्हा पोलिसांनी तपास केल्यानंतर ही घटना समोर आली. पोलिसांनी तिनही भावांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.


























































