रत्नागिरीत 21 जण कोरोना पॉझिटिव्ह; तीन रुग्णांचा मृत्यू

476

रत्नागिरी जिल्ह्यात 21 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण कोरोनापॉझिटिव रुग्णांची संख्या 1070 झाली आहे. तर 10 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 665 झाली आहे. तीन कोरोनाबाधित रूग्णांचा गुरुवारी मृत्यू झाला.

घुडेवठार, रत्नागिरी येथील 56 वर्षीय कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णाची बायपास सर्जरी झाली होती. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दुसरा मृत्यू झालेला रुग्ण हा मिरजोळे, एमआयडीसी, रत्नागिरी येथील असून त्याचे वय 65 वर्षे होते. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. खेड येथील एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे.त्यामुळे कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 37 झाली आहे. जिल्ह्यात सध्या 80 ॲक्टिव्ह कन्टेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात 19 गावांमध्ये, दापोलीमध्ये 10 गावांमध्ये, खेडमध्ये 21 गावांमध्ये, लांजा तालुक्यात 6, चिपळूण तालुक्यात 17 गावांमध्ये, मंडणगड तालुक्यात 3 आणि राजापूर तालुक्यात 4 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या