
रत्नागिरी जिल्ह्यात डेल्टा प्लसचे आणखी तीन रूग्ण सापडले आहेत. हे तिन्ही रूग्ण संगमेश्वर तालुक्यातील असून तिन्ही रूग्ण उपचारानंतर बरे झाले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध आठल्ये यांनी दिली आहे.
राज्यस्तरवरून रविवारी प्राप्त झालेल्या माहितीनुसार, तीन कोविड रूग्णांनध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंट सापडला आहे. याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध आठल्ये यांनी सांगितले की, हे तीन रूग्ण गेल्या महिन्यात दाखल झाले होते.यातील दोन रूग्ण आंगवली आणि एक रूग्ण धामणीतील आहे. त्यांच्यावरील उपचारानंतर ते तिन्ही रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत 15 कोविड रूग्णांमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंट सापडला आहे. त्यापैकी एका रूग्णाचा रत्नागिरीतील महिला रूग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला तर एका रूग्णाचा मुंबईत सेंट जॉर्ज रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्या रूग्णाचा आधारकार्डावरील पत्ता रत्नागिरीचा असल्याने त्यांची नोंद जिल्ह्यात घेण्यात आली आहे.



























































