
गाडीतून डांबर रिकामे करण्यासाठी गरम करत असताना टँकरमध्ये स्फोट होऊन तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गुजरातमधील वडोदराजवळील एका प्लांटमध्ये रविवारी संध्याकाळी ही दुर्घटना घडली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अग्नीशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या.
तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी वडोदरा येथील रुग्णालयात नेण्यात आले. अरमान झियाउल्लाह (26), अशोक गुर्जर (21) आणि शाकिब अख्तर खान (33) अशी मृतांची नावे आहेत.
वडोदरा जिल्ह्यातील सावली तालुक्यातील मोक्षी गावात ही घटना घडली. गाडीतून अडकलेले डांबर बॅरलमध्ये टाण्यासाठी टँकर गरम केले जात होता. या प्रक्रियेदरम्यान टँकरमधील गॅसचा दाब वाढला आणि त्याचा स्फोट झाला. यामुळे जवळच उभे असलेले तीन कामगारांचा स्फोटात मृत्यू झाला, असे भादरवा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले. मृतांमध्ये वाहनाचा चालक, क्लिनर आणि एका कामगाराचा समावेश आहे.