ताडोबात आढळला वाघाचा मृतदेह, कारण अस्पष्ट

चंद्रपूरात एका वाघाचा मृतदेह आढळला आहे. वनविभागाने या वाघाचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवले आहे.

ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पातील तामसी बिट, घोसरी गावाजवळ एका दीड वर्षीय वाघ मृताववस्थेत  आढळला आहे. यामुळे वन विभागात खळबळ उडाली आहे. जंगलात गस्त घालाताना वाघाचा मृतदेह वन कर्मचाऱ्यांना दिसला, कर्मचार्‍यांनी या वाघाचा मृतदेह TTC सेंटर ला नेण्यात आला आहे.   शवविच्छेदन अहवाल मिळाल्यावर वाघाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट होईल अशी माहिती वन विभागातर्फे दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या