वाघांची शिकार करून त्याचे अवयव विकणारे रॅकेट वन विभागाच्या जाळ्यात

10


सामना ऑनलाईन । नागपूर

पेंच व्याघ्र प्रकल्पात वाघांची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे. नुकतेच रामटेकचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्रावण खोबरागडे व सहाय्यक वनसंरक्षक विशाल बोराडे यांच्या नेतृत्वात रामटेक गड मंदिर परिसरात वाघांच्या अवयवांची तस्करी करणाऱया तीन आरोपींना वनविभागाने अटक केली होती. या प्रकरणाचे मूळ थेट पेंच व्याघ्र प्रकल्प छिंदवाडा विभागाच्या कुंभपाणी वनपरिक्षेत्रातील हलाल या गावापर्यंत जाऊन पोहोचले.

सहाय्यक वनसंरक्षक विशाल बोराडे यांच्या नेतृत्वाखाली आरोपींना घेऊन वनविभागाचे पथक मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे गेले तेथील वन्यजीव विभागाच्या मदतीने हलाल या गावातील संदीप नायक व हरिपाल नायकबंजारा या दोन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली. त्यांच्या घरातून वाघाचे विविध अवयव जप्त करण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या