… तर टिकटॉक करणार ‘कमबॅक’, चीनसोबत वादामुळे झालंय बॅन

1219

लडाखमध्ये चीनसोबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानने टिकटॉकसह 106 चिनी ऍपवर बंदी घातली आहे. यामुळे चीनला मोठे नुकसान सोसावे लागत आहे. मात्र चीनचे हे प्रसिद्ध शॉर्ट व्हिडीओ ऍप हिंदुस्थानच्या बाजारात पुन्हा कमबॅक करण्याची शक्यता आहे. अमेरिकेची दिग्गज सॉफ्टवेयर कंपनी मायक्रोसॉफ्ट टिकटॉकचा ग्लोबल बिझनेस खरेदी करण्याचा विचार करत आहे. यात हिंदुस्थानसह युरोपचाही समावेश आहे.

‘फायनान्शियल टाइम्स’ दिलेल्या वृत्तानुसार, टिकटॉकचा ग्लोबल बिझनेस खरेदी करण्यासंदर्भात मायक्रोसॉफ्ट कंपनीची या ऍपची मालकीहक्क असणारी कंपनी बाइटडांससोबत चर्चा सुरू आहे. मात्र मायक्रोसॉफ्टने संपूर्ण बाजार खरेदी करण्याचा प्रस्ताव दिला नसून उत्तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील बाजार खरेदी करण्याचा प्रस्ताव दिल्याचे ‘रॉयटर्स’ने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे. याच्या किंमतीबाबत अद्याप खुलासा झालेला नाही, मात्र 50 अरब डॉलरहुन अधिक ही रक्कम असल्याचे बोलले जात आहे.

अमेरिकेत बंदी
हिंदुस्थाननंतर आता अमेरिकेने टिकटॉकवर बंदी घातली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी या प्रस्तावावर स्वाक्षरी केली. त्यानुसार अमेरिकेत 45 दिवसानंतर टिकटॉकवर बंदी लागू होईल. विशेष म्हणजे टिकटॉकसह चिनी ऍप व्ही चॅट देखील बॅन करण्यात आले आहे.

15 सप्टेंबरपूर्वी सौदा आवश्यक
दरम्यान, मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी ट्रम्प यांची भेट घेऊन टिकटॉकचा अमेरिकेतला बाजार खरेदी करण्याची चर्चा सुरू असल्याची माहिती दिली. मायक्रोसॉफ्ट आणि बाइटडांस हा व्यवहार 15 सप्टेंबर पूर्वी करावा लागणार आहे. कारण यानंतर अमेरिका टिकटॉकला पूर्णपणे बॅन करणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या