मधुबाला की लूक अलाईक? TikTok गर्लचा व्हिडीओ व्हायरल

1244
madhubala-tik-tok-girl

टिकटॉक वर कोण कधी स्टार होईल याचा नेम नाही. या प्लॅटफॉर्मवरून अनेकजण स्टार झाले आहेत. काही जण तर असे आहेत की ज्यांचे हजारों-लाखों फॉलोअर्स आहेत. आज हिंदुस्थानच्या गावापासून ते मेट्रो शहरापर्यंत लाखों लोक टिकटॉक अॅप वापरतात. टिकटॉकमुळे अनेकांच्या छुप्या प्रतिभेला पंख मिळाले आहेत. अशातच एक मुलगी चर्चेत आली आहे. नेटकऱ्यांचं असं म्हणणं आहे की, या मुलीचा चेहरा अनेकांची स्वप्नसुंदरी असलेली अभिनेत्री मधुबालाशी बऱ्याच अंशी मिळताजुळता आहे.

टिकटॉकवरच्या या मधुबालाचं नाव प्रियांका कोंडवाल असं आहे. जर तुम्हीही हा अॅप वापरत असला तर तुम्हाला यावर प्रियंकाचे बरेच व्हिडीओ मिळतील. ज्यामध्ये ती मधुबालासारखी अदाकारी करताना दिसते. टिकटॉवर बरेच युसर्स तिला टिकटॉकची मधुबाला असं म्हणत आहेत. प्रियांका ही सध्या ट्विटरवरही चर्चेत आली आहे. सुनंदा नावाच्या एका युजरने प्रियंकाचा एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. ज्यामध्ये प्रियंका हावडा ब्रिज या चित्रपटातील ‘ये क्या कर डाला तूने दिल तेरा हो गया’ या गीतावर मधुबालाची अदाकारी करताना दिसत आहे.

टिकटॉकवर प्रियांका केवळ 4 लोकांना फॉलो करते तर तिचे 68,000 हजार फॅन्स आहेत. @priyankakandwal ला 3,88,300 हार्ट्स ही मिळाले आहेत. प्रियांकाचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला ही नक्कीच मधुबालाची आठवण येईल.

आपली प्रतिक्रिया द्या