सत्ताधाऱ्यांचा खोटा मुखवटा फाडण्याची वेळ – डॉ. रघुनाथ कुचिक

सत्ताधारी पक्षाकडून केवळ आश्वासने देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. गेल्या अडीच वर्षांपासून सत्ताधारी पक्षातील कोणत्याही मंत्र्यांनी, आमदारांनी विधान भवनात शेतकरी, कामगार यांच्याविषयी चर्चा केली नाही. केवळ जाहिरातीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हिताची घोषणा केली जाते. परंतु सरकारला त्यांच्या प्रश्नांकडे बघण्यासाठी वेळ नसून, स्वतःचा खिसा भरण्याचे काम करत आहे. अशा खोटा मुखवटा घातलेल्या सत्ताधाऱ्यांचा बुरखा फाडण्याची वेळ आली आहे, असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते व भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस डॉ. रघुनाथ कुचिक यांनी शेतकऱ्यांना केले.

हिंदुहृदयसम्राट व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे कलादालन येथे प्रबोधन युवाशक्ती, कृषिकिंग फाऊंडेशन आयोजित तसेच महारुद्र जाधव यांच्या व्यंगचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. रघुनाथ कुचिक यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यंगचित्र अभ्यासक डॉ. प्रवीण मस्तुद, चंद्रशेखर नलावडे, सचिन पाटील, हनुमंत चिकणे, रुपाली पाटील आदी उपस्थित होते.

पैसे तर द्यावेच; शिवाय मालकी हक्क देण्यात यावा. त्यामुळे उपजीविकेचे एक साधन शेतकऱ्याला उपलब्ध होईल. केंद्र सरकारकडून जाचक कायदे करण्यात येतात. नंतर ते पास करतात. राज्य सरकारला शेतकऱ्यांकडे बघायला वेळ नाही. यातून शेतकरी शहाणा झाला पाहिजे. यासाठी मतदानातून धडा शिकवला पाहिजे. दिल्लीतील दोन नेते महाराष्ट्र लुटत आहेत. याचाही गट-तट बाजूला सारून चळवळ उभी केली पाहिजे, तरच सरकार वटणीवर येईल. भाजपकडून नुसती आश्वासने देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. दिवसाढवळ्या शेतकऱ्यांना लुटत आहेत. त्यांना धडा शिकवावा लागेल. डॉ. रघुनाथ कुचिक म्हणाले, शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या मोबदल्यात सरकारकडून एकरकमी
विचार करणे गरजेचे आहे. चंद्रशेखर नलावडे म्हणाले, शेतकऱ्यांची एकी झाली पाहिजे.

महारुद्र जाधव म्हणाले, गेल्या कित्येक वर्षांपासून व्यंगचित्रांतून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडत आलो; परंतु काहींना चांगल्या गोष्टी करताना खोडा घालण्याची सवय असते. परंतु मी माझे काम प्रामाणिकपणे करत आलोय, यापुढे करणार आहे.

व्यंगचित्रांतून समस्यांचे अचूक दर्शन…
काही गोष्टी समजून घेण्यासाठी कित्येक दिवस लागतात. त्यासाठी पुस्तके वाचावी लागतात. संशोधन करावे लागते; परंतु व्यंगचित्र असे माध्यम आहे, त्यामुळे हजारो समस्यांचे अचूक दर्शन एका चित्रातून होते. महारुद्र जाधव हे शेतकऱ्यांच्या व्यथा व्यंगचित्रांतून अफलातून मांडत आहेत, हे त्यांच्या चित्रांतून दिसून येते, असेही डॉ. रघुनाथ कुचिक म्हणाले.