हे करून पहा – डोळे स्वच्छ अन् निरोगी ठेवण्यासाठी…

मोबाईल, टीव्ही आणि लॅपटॉपवर जास्त स्क्रीन टाईम दिला जात असल्याने डोळय़ांना थकवा येतो. डोळे जळजळ करतात तर कधी कधी डोळय़ांची दृष्टी कमी होते. जर तुम्हाला डोळे स्वच्छ आणि निरोगी ठेवायचे असतील तर दिवसातून एकदा तरी डोळे थंड पाण्याने धुवा.

डोळे धुण्यासाठी स्वच्छ आणि कोमट पाणी वापरा. डोळय़ातील धूळ किंवा कण काढून टाकण्यासाठी पाणी डोळय़ावर पाणी मारा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, आय ड्रॉप्स वापरता येतील. डोळय़ांना त्रास होत असेल तर डोळे चोळू नका. डोळे निरोगी ठेवण्यासाठी आहारात पुरेसे फळे, भाज्या खा. डोळय़ांना जर जास्त वेदना होत असतील तर त्वरित डोळय़ांच्या डॉक्टरकडे जा.