उन्हाळ्यात अशा प्रकारे घ्या डोळ्यांची काळजी, वाचा खास टिप्स

>> डॉ. वामशिधर

सूर्य सर्वत्र आग ओकत असतो तो उन्हाळाचा हंगाम सुरू झालेला आहे. आपल्याला सर्वांना एअर-कंडिशन खोलीतच राहण्याची, आइस्क्रिम खाण्याचीची, ज्युस पिण्याची खूप इच्छा होते. पण हा विचार करत असताना आपण डोळे या अतिशय महत्त्वाच्या अवयवाकडे अनेकदा दुर्लक्ष करतो. अनेकजण त्वचेची काळजी घेण्यासाठीची कटाक्षाने पथ्य पाळतात आणि उष्ण हवामानाला अनुसरून आहार घेण्याकडे लक्ष देतात, परंतु उन्हाळ्यामध्ये डोळ्यांचे रक्षण करण्याच्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे मात्र दुर्लक्ष करतात.

तापमान वाढल्यानंतर आपल्याला विविध प्रकारचे आजार होऊ शकतात आणि त्यामुळे डोळ्यांची अधिक काळजी घेणे गरजेचे ठरते असा सल्ला डॉक्टर देतात.

उन्हाळ्यात होणारे आजार आणि संसर्ग

सूर्यप्रकाशाशी थेट संपर्क येणे

सूर्यप्रकाशामध्ये अतिनिल किरणांचा समावेश असल्याने मोतिबिंदू होण्याचा धोका अधिक असतो, रेटिनाचे नुकसान होण्याची म्हणजे सोलार रेटिनोपॅथीची संभाव्य शक्यताही वाढते.

सूर्यप्रकाशातील अतिनिल किरणांशी थेट संपर्क आला तर पेरिजिअम म्हणजे कॉर्नियाची अतिरिक्त वाढ करणारा आजार होऊ शकतो.

उन्हाळ्यामध्ये अनेकांना डोळे कोरडे पडण्याचा त्रास होतो.

उन्हाळ्याच्या दरम्यान, सूर्यप्रकाशाशी आणि अतिरिक्त उष्णतेशी संपर्क आल्याने डोळ्यांमध्ये कोरडेपणा येतो व त्यामुळे डोळ्यांतील टिअर फिल्मचे प्रमाण कमी होते.

अॅलर्जिक कॉन्जंक्टिव्हायटिस व व्हायरल कॉन्जंक्टिव्हायटिस यामध्ये अचानक वाढ होत असल्याचेही निदर्शनास आले आहे.

उन्हाळ्यात डोळ्यांची अशी घ्या काळजी

डोळ्यांना होणारे कोणतेही नुकसान रोखण्यासाठी यूव्ही प्रोटेक्शन सनग्लासेस उपयुक्त ठरतात, तसेच त्यामुळे सूर्यप्रकाशाशी येणारा संपर्कही कमी होतो.

उन्हाळ्यामध्ये डोळ्यांमध्ये कोरडेपणा येण्याचे प्रकार सर्रास घडतात. पुरेसे पाणी पिणे, परिपूर्ण आहार घेणे आणि पाणीदार फळे खाणे यामुळे डोळ्यांतील कोरडेपणा रोखण्यासाठी मदत होत असल्याने याद्वारे उन्हाळ्यामध्ये हायड्रेटेड राहावे.

डोळ्यांचा नैसर्गिक ओलावा कायम राखण्यासाठी कृत्रिम अश्रू, ल्युब्रिकंट किंवा आय ड्रॉपसारख्या पर्यायी घटकांची मदत होते. उन्हाळ्यामध्ये त्यांचा वापर केला तर डोळ्यांचा कोरडेपणा रोखण्याबरोबरच कोणत्याही प्रकारचा संसर्ग रोखण्यासाठी ओलावा जतन करून ठेवणे शक्य होते.

उन्हाळ्यात हिरव्या पालेभाज्या, गाजर, काकडी, पपई यांचा आहार वाढवावा, -त्यामध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असतं.

डोळ्यांची योग्य काळजी घेणयासाठी संतुलित आहार घेणे, पुरेसे पाणी पिणे आणि वर नमूद केलेल्या टिप्स अंमलात आणणे गरजेचे आहे.

लेखक फॅको रेफ्रॅक्टिव्ह सर्जन मॅक्सिव्हिजन आय रुग्णालयात डॉक्टर आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या