
– शरीरातील रक्ताची कमतरता (ऑनिमिया) असणाऱया रुग्णांनी नियमितपणे रोज 2 टोमॅटो खावेत.
– टोमॅटोमधील व्हिटॅमिन आणि कॅल्शियम ही दोन्ही तत्त्वे हाडांना मजबूत करण्याचे काम करतात. तसेच टोमॅटोमधील व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट हाडातील दोष दूर करण्यास मदत करतात. त्यामुळे टोमॅटो खाणे किंवा त्याचा आहारात वापर करणे गरजेचे आहे.
-कॅन्सरसारख्या आजारावर टोमॅटो गुणकारी मानला जातो. त्याच्यातील औषधीय गुणांमुळे पॅन्सरसारख्या घातक आजारांपासूनही बचाव होतो. टोमॅटोमध्ये लायकोपिन नामक घटक भरपूर प्रमाणात आढळतो, जो कोणत्याही प्रकारचा पॅन्सर रोखण्यास फायदेशीर आहे.
– टोमॅटो खाणे आवडत नसेल तर त्याचा ज्यूस प्यायला तरी तो उपयुक्त आहे. हा ज्यूस मोठय़ांनाच नाही, तर लहानग्यांसाठीही फायदेशीर आहे. मुलांच्या मानसिक- शारीरिक विकासात त्यामुळे मदत होते.
– पोटात जंत झाले असल्यास टोमॅटो कापून त्यात हिंग घालून त्याचे सेवन करा, आपल्याला फायदा होईल किंवा टोमॅटो कापून त्यात काळी मिरी पावडर टापून 2 ते 3 दिवस त्याचे सेवन करत असाल तर हे आपल्यासाठी लाभदायी ठरेल. यामुळे गॅसचा त्रास होणार नाही. तसेच अस्वस्थ व अतिसारासारख्या समस्यादेखील होणार नाहीत.
– गर्भवती आणि बाळंतीण महिलांनी दररोज टोमॅटो खाल्ल्यास त्यांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगले राहते. स्त्रियांना होणाऱया अनेक आजारांमध्ये टोमॅटो खाणं उपयुक्त ठरतं.
– टोमॅटो डोळ्यांसाठीही तितकाच महत्त्वाचा आहे. त्यामध्ये असलेले ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्व डोळ्यांसाठी चांगले मानले जाते. जे डोळ्यांची नजर वाढवण्यास मदत करतं. याशिवाय टोमॅटोमुळे डोळ्यांना होणारा रांताधळेपणाही कमी होतो. टोमॅटो मोतीबिंदूची वाढही रोखतो.























































