पिंपल्सचे काळे डाग घालवण्यासाठी

तुळशीची पाने स्वच्छ धुवून एका वाटीत दहा तास तरी भिजत घाला. यानंतर भिजलेली पानं पाण्यासकट मिक्सरमधून फिरवून घ्या. यानंतर हे पाणी गाळून घ्या.

आता हे पाणी एखाद्या काचेच्या स्प्रे बॉटलमध्ये भरा आणि दिवसातून दोन-तीन वेळा तसेच रात्री झोपण्यापूर्वी चेहऱयावर शिंपडा. हा उपाय काही दिवस नियमितपणे करा. चेहऱयावर जर पिंपल्सचे डाग पडले असतील तर जायफळाचा एक छोटासा तुकडा आणि थोडेसे हळपुंड कच्चे दूध घालून सहानीवर उगाळून घ्या. हा लेप जिथे पिंपल्सचे डाग पडले असतील त्या भागावर लावा. त्यानंतर 10 मिनिटांची चेहरा धुवून टाका.