
नारळ फोडल्यावर जास्त दिवस टिकत नाही. दोन दिवसांत त्याला आंबूस वास येतो. असे होऊ नये म्हणून काही टिप्स लक्षात ठेवता येतील. नारळाला हवेच्या संपर्कात येऊ देऊ नका. नारळाच्या तुकडय़ांना हवाबंद कंटेनरमध्ये ठेवा. किसलेल्या नारळाला थोडे सुकवून डब्यात ठेवा.
फोडलेल्या नारळाला थोडे तेल लावा. त्यामुळे बुरशी लागणार नाही. तसेच थोडे मीठदेखील लावता येईल. नारळ ज्या ठिकाणी साठवणार असाल, तो डबा साफ असायला हवा. डब्यात पाणी असेल तर नारळ लवकर खराब होतो.





























































