
झोपेत घोरण्यामुळे बाजूला झोपलेल्या व्यक्तीची झोपमोड होऊ शकते. त्यामुळे झोपेतील घोरणे कमी करायचे असेल तर सर्वात आधी पाठीवर झोपण्याऐवजी एका बाजूला झोपण्याचा प्रयत्न करा. कारण यामुळे वायुमार्ग खुला राहण्यास मदत होते. झोपताना अशी उशी वापरा जी तुमचे डोके योग्य स्थितीत ठेवते.
वजन कमी केल्याने घोरण्याची समस्या कमी होऊ शकते. दररोज झोपण्यापूर्वी नाक स्वच्छ करा. कारण सर्दी किंवा नाक चोंदलेले असल्यास घोरण्याची शक्यता अधिक वाढते. सगळे उपाय करूनही जर घोरणे कायम राहत असेल किंवा दुसऱ्याची झोप खराब होत असेल, तर तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्याचा प्रयत्न करा.































































