तिरुपती मंदिरात भीक मागणार्‍याच्या घरात सापडले लाखो रुपये

तिरुपती मंदिरात भीक मागणार्‍या व्यक्तीच्या घरात पोलिसांना दोन पेटी भरून नोटा सापडल्या आहेत. खूप वेळ पैसे मोजण्यात गेले तेव्हा नेमकी रक्काम किती आहे हे लक्षात आले.

तिरुपती मंदिरात श्रीनिवासन नावाचा व्यक्ती भीक मागायचा. त्याचे हल्लीच वयाच्या 64 वर्षी निधन झाले. श्रीनिवास तरुण असताना तिरुपती मंदिरात आला आला आणि त्याने भीक मागायाल सुरूवात केली.

श्रीनिवासन शक्यतो व्हीआयपी लोकांकडे भीक मागायचा. त्यांना टिळा लावायचा आणि व्हीआयपी, सेलिब्रिटी लोक त्याला पैसे द्यायचे. पैसे घेतल्याशिवाय श्रीनिवासन त्यांची पाठच सोडायचा नाही. लग्नानंतर जेव्हा दीपीका पदुकोण आणि रणवीर सिंह तिरुपती दर्शनासाठी आले होते तेव्हा श्रीनिवासने त्यांनाही टिळा लावून त्यांच्याकडून पैस घेतले. अशा प्रकारे त्याने भरपूर पैसे जमा केले होते.

काही दिवसांपूर्वी त्याचे निधन झाले. त्याला कोणी नातेवाईक नव्हते. म्हणून त्या भागातील काही लोक त्याच्या घरावर अनधिकृत ताबा मिळवण्याच्या प्रयत्नात होते. पोलिसांना जेव्हा ही बातमी मिळाली तेव्हा त्यांनी महसूल खात्यासह श्रीनिवासनच्या घरावर छापा मारला. या छाप्यात त्यांना दोन पेटी भरून नोटा आढळला. संपूर्ण दिवस कर्मचार्‍यांनी या नोटा मोजल्या. तेव्हा एकूण रक्कम 6 लाख 15 हजार 50 रुपये इतकी होती. ही रक्कम सरकारने ताब्यात घेतली असून पुढील कारवाई सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या